महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA

आमची यशोगाथा

गावाविषयी माहित

तडीयाळे हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील अरबी समुद्र किनार्‍यालगत आहे . सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १०६२ आहे.

गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०१, अंगणवाडी केंद्र ०१, सभामंडप-०१  तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बाडापोखरन प्रादेशिक नळ योजना आहेत. अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच श्री केवलेश्वर महादेव मंदिर आहे.

१.     गावातील बहुतांश लोकांची मुख्य व्यवसाय शेती,मासेमारी,डायमेकिंग आहे.

२.     तडीयाळे ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना बरा पैकी लाभ मिळाला आहे.

३.     ग्रामपंचायत प्रशासक असून सदस्य पदरिक्त आहे.ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

भौगोलिक स्थान

तडीयाळे हे गाव डहाणू  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ०६कि.मी.अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ         हे आर असून  ग्रामपंचायती मध्ये महसूल ०१ गाव   ०३ वार्ड आहेत..एकूण २७० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १०६२ आहे.त्यामध्ये ५५२ पुरुष  व ५१० महिला यांचा समावेश आहे.. त्या तलावचा पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी  केला जातो व  हे मासेमारी उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३७°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १७°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ५९ ते ६८ से.मी. पर्जन्यवृष्टी होते.वावर  मासेमारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

संस्कृती परंपरा

तडियाळे  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात धार्मिक  गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

         गावात लोककला, सांकृतिक कार्यक्रम,आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

लोकजीवन

तडीयाळे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय असून व हंगामी भात,मिर्ची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तडीयाळे च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


230
1062
552
510

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo